बीड पोलिसांची मोठी कारवाई  : वाल्मिक कराड नंतर आता अक्षय आठवले गँगवर मकोका
बीड पोलिसांची मोठी कारवाई : वाल्मिक कराड नंतर आता अक्षय आठवले गँगवर मकोका
img
दैनिक भ्रमर
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असून बीडमधील टोळ्यांची दहशत संपवण्यासाठी बीड पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहे.  जिल्ह्यात आणखी एका गँगवर मकोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बनावट नोटा प्रकरण आणि गोळीबार प्रकरणात अक्षय आठवले गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गोळीबार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, एका महिन्यात दोन टोळ्यावर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे. बीडमधील कुख्यात आठवले गँगवर मकोका लावण्यात आहे. तसेच सहा जणा विरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, प्रसाद धीवर, ओंकार सवाई या सहा आरोपीचा समावेश आहे.

13 डिसेंबरला बीड जिल्ह्यात एक गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबारात 13 राऊंड फायर करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी गँगवर मकोका लावण्यात आला आहे. मकोका लावण्यात आलेल्या या सहा आरोपींपैकी सनी आठवले आणि आशिष आठवले फरार आहे. या गँगवर गंभीर स्वरूपाचे 19 गुन्हे दाखल आहेत. संघटित गुन्हेगारीमध्ये खून , दरोडा, खुनाचा प्रयत्न, बलात्कार खंडणी,लुटमार, बनावट नोटा, मारहाण असे गुन्हे आहेत. याचा अधिक तपास पोलिस करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group