मोठी बातमी !  बीड प्रकरणी नवी SIT स्थापन, राज्यसरकारचा निर्णय
मोठी बातमी ! बीड प्रकरणी नवी SIT स्थापन, राज्यसरकारचा निर्णय
img
दैनिक भ्रमर

मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या  प्रकरणी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना १ जानेवारी रोजी केली होती. दोन कोटींची खंडणी आणि हत्या या दोन्हींच्या प्रकरणांच्या अनुषंगाने पथकाकडून तपास सुरू होता. मात्र विशेष तपास पथकातील अनेक अधिकाऱ्यांची वाल्मिक कराड याच्याशी दोस्ती असल्याने आणि अधिकारी-कराड यांचे फोटो समाज माध्यमांत प्रसिद्ध झाल्याने देशमुख कुटुंबियांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. देशमुख कुटु्ंबियांनी तपास पथकातील अधिकाऱ्यांवर आक्षेप नोंदविल्यानंतर राज्य शासनाने मोठा निर्णय घेत नवे विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या पथकात एकूण नऊ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.देशमुख कुटुंबियांची मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानंतर खंडणी आणि हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्या अध्यक्षतेखाली नव्या विशेष तपास पथकाची स्थापन करण्यात आली आहे.

एसआयटी   या  अधिकाऱ्यांचा समावेश

१)अनिल गुजर- पोलीस उपअधीक्षक
२) विजयसिंह जोनवाल- सहाय्यक पोलीस निरीक्षक
३) महेश विघ्ने-पोलीस उपनिरीक्षक
४) आनंद शिंदे-पोलीस उपनिरीक्षक
५) तुळशीराम जगताप- सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
६) मनोज वाघ- पोलीस हवालदार
७) चंद्रकांत काळकुटे- पोलीस नाईक
८) बाळासाहेब अहंकारे-पोलीस नाईक
९) संतोष गित्ते-पोलीस शिपाई

दरम्यान, आधीच्या तपास पथकाली अनेक आरोपी वाल्मिक कराडच्या जवळचे होते किंबहुना संबंधित पोलिसांची वाल्मिक कराड याच्याच प्रयत्नातून नियु्क्ती किंवा बदली झाली होती, असे दबक्या आवाजात सांगण्यात येत होते. चर्चेला पुष्टी देणारे फोटोही समाज माध्यमांत प्रसिद्ध होत होते त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी शासकीय पातळीवरील जबाबदारी स्वीकारून पथकात फेरबदल होतील, यासाठी पाठपुरावा केला. याकामी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आदेश निर्गमीत करण्याची विनंती केली. अखेर फडणवीस यांनी आदेश देऊन पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्या अध्यक्षतेखाली नव्या विशेष तपास पथकाची नियुक्ती केली.


इतर बातम्या
Join Whatsapp Group