अंजली दमानिया नंतर आता सुरेश धस  यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला ''हा'' गंभीर आरोप
अंजली दमानिया नंतर आता सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला ''हा'' गंभीर आरोप
img
दैनिक भ्रमर
सरपंच संतोष देशमुख यांच्या  हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून वाल्मिक कराड अटक प्रकरणामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान , धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी आरोपाची माळ लावली. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी देखील आता धनंजय मुंडे यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे. 

 भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पिक विमाचा कोट्यावधीचा घोटाळा धनंजय मुंडे यांनी हा दाबून ठेवला, असा गंभीर आरोप केला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती ही 5000 कोटींची असून परळी मार्गेचे राज्यात बोगस पिक विमा रॅकेट चाललं आहे. त्यावर उच्चस्तरीय चौकशी समितीने व्हावं अशी मागणी ही सुरेश धस यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी आरोपाची माळ लावली. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पिक विमा घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावली आहे मात्र मंत्री धनंजय मुंडे यांनी हा घोटाळा दाबून ठेवला आहे. मीडिया ट्रायल कोण कशाला करले. राखेत तुम्ही, पिक विमा तुम्ही, माणसं मारायला तुम्हीच महादेव मुंडे पंधरा महिने झालं हत्या झाली त्याच्या आरोपी सापडून न देणारे तुम्ही, तुमच्यावरच का येतं, दुसऱ्यावर का येईना, असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला.

‘अंजलीताई यांच्याकडून चूक होते हा घोटाळा साडेपाचशे कोटीचा घोटाळा आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याची चौकशी लावली आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी हा घोटाळा दाबून ठेवला आहे. परळी मधीलच जास्ती लोक आहेत. राज्यात उघडले असतील असे बोगस सगळे परळी मार्गे तिथे गेलेले आहेत आणि हा घोटाळा 5000 कोटीच्या वरचा घोटाळा आहे आणि त्याच्यावरती ही मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिले आहेत याच्यावर चौकशी समितीने व्हावे त्या चौकशी समिती आयुक्त राहिलेला एखादा अधिकारी किंवा कमिशनर नेमावा, खूप मोठा घोटाळा पुढे येईल, असा दावाही धस यांनी केला.

केंद्र सरकारची कंपनी आहे, याचा थेट संबंध आहे आणि अर्धा पैसा केंद्र सरकार देत आहे. अर्धा खर्च हा राज्य सरकार देत आहे. 99 रुपये अर्धे केंद्राच्या आणि अर्धे राज्याच्या आहेत. केंद्राने जर चौकशी लावली तर सीबीआय मार्फत त्याची चौकशी करू शकतो किंवा आणखी एखाद्या तपासी यंत्रणाकडून चौकशी करू शकतो.धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा सर्वस्वी अधिकार अजितदादांचा आहे. अजित दादांना ही जनतेमधून किती ई व्हॅल्युएट व्हायचंय. हे त्यांनी ठरवावं. आता त्यांनी काय करावं, हे माझ्यासारख्या पामराने काय सांगावं, आम्ही तर चिलाटासारखे आहोत, असं म्हणत धस यांनी अजितदादांना टोला लगावला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group