संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टर माईंड कोण ?  CID च्या आरोपपत्रातून अखेर नाव समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टर माईंड कोण ? CID च्या आरोपपत्रातून अखेर नाव समोर
img
दैनिक भ्रमर
संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. दरम्यान, सीआयडीने या प्रकरणात 1800 पानाच आरोपपत्र दाखल  केले असून आता या प्रकरणाची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. CID च्या आरोपपत्रातून हत्याप्रकरणाचा मास्टर माईंड चे नाव समोर आले आहे . 

 सीआयडीने 1800 पानाच आरोपपत्र दाखल केलय. त्यानुसार वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाइंड असल्याच सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. खंडणी उकळण्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असं सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे-जे मोर्चे निघाले, आंदोलन झाली त्यावेळी विविध नेत्यांनी, ग्रामस्थांनी अशाच प्रकारचे आरोप केले होते. आरोपपत्रात सुद्धा हेच नमूद असल्यामुळे त्यावर आता शिक्कामोर्तब होत आहे. सीआयडीच्या आरोपपत्रानुसार वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येमागचा मुख्य मास्टरमाइंड आहे.

या प्रकरणात आठ जणांवर मकोका कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडसह इतर आरोपींचा या गुन्ह्यामध्ये जो सहभाग आहे, तो सुद्धा मांडण्यात आला आहे. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये हत्येच्या दिवशी आणि त्याआधी जे संभाषण झालं, नेमकं काय बोलणं झालं, संतोश देशमुख यांची हत्या कशी झाली? त्याची माहिती सीआयडीच्या आरोपपत्रातून देण्यात आली आहे

दरम्यान, संतोष देशमुख यांना मारहाण करताने जे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं ते सीआयडीच्या हाती लागलं. संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपी दिसतायत, ते पुरावे सीआयडीने आरोपपत्रात जोडले आहेत. वाल्मिक कराडला अवादा कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणी उकळायची होती. पण त्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून वाल्मिक कराडने हत्येच कारस्थान रचलं. हत्येमागच हेच कारण असल्याच सीआयडीच्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group