मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी करत आहेत. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत अनेक खुलासे झाले असून आता या प्रकरणाची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील वाशी इथला आणखी एक सीसीटीव्ही समोर आलाय.
9 डिसेंबर 2024चा हे सीसीटीव्ही असून ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, त्याच दिवसाशी देशमुखांचे मारेकरी पळून जातानाचा हा व्हिडिओ आहे. या 18 सेकंदाच्या व्हिडिओत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी त्यांची स्कॉर्पिओसोडून रस्त्यानं पळून जाताना दिसतायत. हा हत्या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा मानला जात असून यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सहा आरोपी एकाच गाडीतून उतरताना दिसत आहे.
संतोष देशमुखांचे 9 डिसेंबरल दुपारी तीन वाजता अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत देशमुखांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह रस्त्याला फेकून हे सर्व आरोपी धाराशिव जिल्ह्यातील वाशीकडे स्कार्पिओ घेऊन फरार झाले. त्यावेळी पोलीस त्यांचा पाठलाग करत होते. आरोपींच्या मागे पोलीस असतानाही हे आरोपी पोलिसांच्या समोरच कसे पळून गेले असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातीस प्रमुख सहा आरोपी दिसत आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे या व्हिडीओमध्ये आहे. सहा आरोपी या गाडीमध्ये आहेत. स्कार्पिओ रस्त्यावर सोडूनच हे सर्व आरोपी पळताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.