मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे देशभरात कुख्यात झालेल्या बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. कारण बीडमध्ये पुन्हा एकदा एका व्यक्तीचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान शिवराज हनुमान दिवटे या तरूणाचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आले.
याठिकाणी समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराज दिवटेला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शिवराज दिवटे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला परळी येथून अंबाजोगाईच्या स्वराची रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
या प्रकरणात आता बीड पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.