"... तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल" ; बड्या नेत्याचं वक्तव्य
img
DB
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि बीडमधील प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आरोप केले जात आहे. भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) बजरंग सोनवणे यांच्यासह अनेकजणांकडून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. 

धनंजय मुंडे याला जबाबदार असल्याचा आरोप होतोय. जर या आरोपात तथ्य असेल तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेय. 

बीड प्रकरणात धनंजय मुंडेंबाबत तथ्य असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचा राजीनामा घेतील, पण वाल्मिकी कराडबाबत टप्प्या-टप्प्याने कारवाई सुरू असून ती समाधानकारक आहे, असं विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेय. ते सांगलीत बोलत होते.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group