संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण आणि समजकारण ढवळून निघालेय. वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आल्यानंतर समर्थक आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपासून परळीमध्ये आंदोलन केले जात आहे. काही समर्थकांकडून रस्तारोकोही करण्यात आलाय. परळी आणि आजूबाजूच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैणात करण्यात आलाय. वाल्मिक कराड याच्या गावात एका तरूणाने आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे.
परळी तालुक्यातील शिरसाळा , धर्मापुरी गाव बंदची हाक ग्रामस्थांनी दिलीय. वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ धर्मापुरी आणि शिरसाळा गाव सकाळपासून बंद ठेवण्यात आले असून सर्व व्यवहार ठप्प करण्यात आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी जातिवाद करीत असून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना टार्गेट करत आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मात्र विनाकारण कराड याला गोवले जात असून हे राजकारण थांबवले जावे. अशी मागणी या बंदच्या माध्यमातून केली जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आलाय. कराड याच्यावर मोक्का लावल्यानंतर समर्थक आक्रमक झाले. मंगळवारी परळीमध्ये उग्र आंदोलन करण्यात आले. आजही परळी बंदची हाक देण्यात आली आहे.
वाल्मिक कराड याचा ताबा घेण्यासाठी एसआयटीने कोर्टात धाव घेतली आहे. वाल्मिक कराड याला आज कोर्टात हजर करण्यात आले. पण त्याआधी कराड यांचे वकील आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. केज न्यायालयाच्या गेटवर पोलीस अन् वकीलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिसांकडून बॅगाच्या तपासनीसह प्रत्येकाची तपासणी केली जात असल्याने शाब्दिक चकमक झाली.
वाल्मिक कराड याच्यावर दाखल कऱण्यात आलेले गुन्हे खोटे आहेत, राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे मागे घेण्यासाठी कराड समर्थक आक्रमक झाले आहेत. परळी आणि आजूबाजूच्या ठिकाणी उग्र आंदोलन करण्यात येतेय. वाल्मिक कराड याच्या गावात तरूणाने टॉवरवर चढत आंदोलन केलेय. तो मागील चार तासांपासून टॉवरवर चढून आंदोलन करत आहे. वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा आयुष्य संपवेल, असा इशारा त्याने सरकारला दिलाय. वाल्मिक कराड याच्या पांगरी गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.