आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी काल न्यायालयाने आरोपी वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी देण्याचा निर्णय घेतला आहे. वाल्मिक कराडला बुधवारी रात्री दीड वाजता केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले होते. अशातच आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.
केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात त्याला आणलयानंतर वैद्यकीय पथकाने तपासणी केली असता त्याला रात्री श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्याची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे.
सीआयडीच्या कोठडीत त्याची शुगर वाढली असल्याने त्याला डॉक्टरांनी ऑक्सिजन लावले. त्यानंतर त्याला बरे वाटले. सीआयडीचे एसपी बीड शहर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले असून आता त्याची सीआयडीकडून सखोल चौकशी केली जात आहे.