मोठी बातमी ! निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात
मोठी बातमी ! निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात
img
Dipali Ghadwaje
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्लॅन असल्याचा धक्कादायक दावा करणाऱ्या रणजित कासलेला बीड पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज(शुक्रवार) पहाटे त्याला ताब्यात घेण्यात आले.

पुण्यात आल्यानंतर कासले मीडियाशी संवाद साधताना धनंजय मुंडेंनी माझ्या खात्यावर 10 लाख रुपये पाठवल्याचा गौप्यस्फोट केला होता. मतदानाच्या दिवशी ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते, असा दावा कासले याने केला होता.

रणजित कासले काल (गुरुवारी) दिल्लीवरून पुण्यात आला होता. तो रात्री पुण्यातील एका हाॅटेलमध्ये मुक्कामी होता. आपण पोलिसांना शरण जाणार असल्याचे त्याने अधिच जाहीर केले होते. मात्र, आज पहाटे बीड पोलिसांनी कारवाई करत त्याला हाॅटेलमधून अटक केली.

बीड पोलिस दलात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन खंडणी मागितल्या प्रकरणी रणजित कासले याला निलंबित करण्यात आले होते. 

त्यानंतर मागील काही दिवसांपासून तो व्हिडिओ बनवून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत होता. आपल्याला वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी ऑफर असल्याचे तसेच यासाठी 5 ते 50 कोटीही देण्यात येणार होते, असा दावा त्याने केला होता. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group