बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि येथील पवनचक्कीला दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या विष्णू चाटे याने सीआयडीच्या चौकशीत मोठी कबुली दिली आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , विष्णू चाटे याने चौकशी दरम्यान मोठी कबुली दिली आहे. वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केलं होतं, वाल्मिक कराडचे अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याचं चाटेने चौकशीदरम्यान सांगितलं. सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात मोठा खुलासा केला आहे.
विष्णू चाटे याच्या फोनवरून कराडने धमकी दिल्याची कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. कराडने कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असल्याचे चाटेने कबूल केलं आहे.