"या" ठिकाणी काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसणार ? 'हा' बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश
img
DB
पुणे : काँग्रेसचे बडे नेते संग्राम थोपटे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. ते काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित असल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप प्रवेशासंदर्भात थोपटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत बैठक झाल्याचंही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

काँग्रेसचे नेते संग्राम थोपटेंनी एकूण तीनवेळा भोर विधानसभा मतदारसंघाचं आमदारपद भूषवलेलं आहे. या मतदारसंघात त्यांचे मोठे प्रस्थ आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराकडून पराभूत झाले. थोपटे यांनी भोरमध्ये त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. याच बैठकीत कदाचीत त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय होऊ शकतो. येत्या रविवारी ते काँग्रेस सदस्यत्व पदाचा राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे.

थोपटेंनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. येत्या २२ एप्रिल रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असं बोललं जात आहे. मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होईल, असंही सांगण्यात आलेलं आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group