राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग ; धनंजय मुंडे राजीनामा देणार? अजितदादांच्या भेटीसाठी पोहोचले
राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग ; धनंजय मुंडे राजीनामा देणार? अजितदादांच्या भेटीसाठी पोहोचले
img
Dipali Ghadwaje
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. हे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. 

दरम्यान आता या प्रकरणात आज सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राज्यपालांकडे सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली आहे. 

या प्रकरणात दबाव वाढत आहे. अशातच मंत्री धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. धनंजय मुंडे हे अजितदादांच्या मंत्रालयातील दालनात त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या 15 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. अजित पवार आता या प्रकरणात नेमका काय निर्णय घेणार? दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group