बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रासह राजयोतील राजकारणही ढवळून निघालं. दरम्यान या प्रकरणावरून विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रकरणावरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांना घेरलं असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान , या सगळ्या वादावर अखेर धनंजय मुंडेंनी मौन सोडलं आहे. योग्य वेळ आल्यावर मी बोलेन, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहेत, यानंतर वाल्मिक कराड फरार आहेत. संतोष देशमुख हत्येप्रकरणी शनिवारी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला, या मोर्चाला सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. या सगळ्या वादावर अखेर धनंजय मुंडेंनी मौन सोडलं आहे. योग्य वेळ आल्यावर मी बोलेन, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. मुंबईच्या वाळकेश्वर येथील श्री प्रसन्न वीर हनुमान मंदिर येथे दर्शनासाठी धनंजय मुंडे आले होते. मी दर शनिवारी दर्शनासाठी या मंदिरामध्ये येतो, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे
वाल्मिक कराड हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे मानले जातात. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंनीही ते नाकारलं नाही. पण या प्रकरणी जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप आहे. तर मुंडेंशी असलेल्या जवळीकीमुळेचं कराडवर पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.