बीडमधील सरपंच हत्याप्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहे. भाजप आमदार सुरेश धस हे वारंवार धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. धनंजय मुंडे प्रककरणावरुन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य आपली भूमिका मांडलीय.
काय म्हणाले अजित पवार?
कुठल्याही चौकशीत आरोप झाला तर तुम्ही दोषी आहे, आज एसआयटी चौकशी चालू आहे. सीआयडी चौकशी चालू आहे. न्यायालयीन चौकशी चालू आहे. तीन वेगवेगळ्या एजन्सी चौकशी करतात. स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जो कुणी दोषी असेल, जो संबंधित असेल ते सिद्ध झालं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.
माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वेगवेगळ्या तपास यंत्रणेकडून तपास चालू आहे. आता कुठल्याही चौकशीत आरोप झाला तर तुम्ही दोषी आहे, आज एसआयटी चौकशी चालू आहे. सीआयडी चौकशी चालू असल्याचं अजित पवार म्हणालेत. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव येत आहे. यावरून पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न केला. त्यावर अजित पवार यांनी रोखठोक उत्तर दिलंय.
बीड प्रकरणात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहोत. या संदर्भात पक्ष न बघता जर कुणी वरिष्ठ पातळीवर काम करणारे व्यक्ती दोषी असतील तर कुणाचीही गय करू नका. मुख्यमंत्रीही त्या मताचे आहेत असं अजित पवार म्हणालेत.
प्रत्येकाची चौकशी करून किती फोन झाले, कुणाचे किती फोन कुणाला झाले, याच्यावर बारकाईने लक्ष दिलं जात आहे. तितक्याच गांभीर्याने सरकारने लक्ष दिले आहे. अर्थात समोरील विरोधी पक्षातील लोकांना, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधींनी काय बोलायचे याचे अधिकार दिले आहेत. पण कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यायला पाहिजे असेही यावेळी अजित पवार म्हणाले. .