विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा बीड दौऱ्यावर आहेत. बीडमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, बजरंग सोनावणे, राधाकृष्ण विखे पाटील अशा बीडच्या बड्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांच्यासमोर पंकजा यांनी 'माझं वचन हेच माझं शासन' असे विधान केले.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
"देवेंद्रजी सुरेश धस तुम्हाला 'बाहुबली' म्हणतात. खरं तर तुम्ही आम्हाला जेष्ठ आहात, नेते आहात. आम्ही ज्या कॅबिनेटमध्ये काम करतो तुम्ही त्याचे प्रमुख आहात. तुमच्याविषयी आदरभावच नेहमी येतो. आज ममत्वभाव येत आहे. धस तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत. काही वर्षांपूर्वी ते मला 'शिवगामिनी' म्हणत होते.
कारण शिवगामिनी ही बाहुबलीची आई आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. शिवगामिनीचं वाक्य असतं. जसं तुम्ही पिक्चरच डायलॉग म्हणता तसचं आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो.
" त्या पुढे म्हणाल्या, "शिवगामिनीचं वाक्य असतं 'मेरा वचन ही है मेरा शासन' आणि जे जाहीर वचन मी सुरेश धसांना दिलयं तेच माझं शासन आहे मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. बोलणं एक आणि करणं एक हे माझ्या रक्तात नाही. आज या कार्यक्रम सुरेस धसांनी आवर्जुन उल्लेख केला.
प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश धस अण्णांनी सांगितला. सुरेश अण्णा, मीपण तुम्हाला अण्णाच म्हणते. तुम्हीच ताईसाहेब म्हणत नाही.. जशाला तसचं आहे आपलं प्रेमाचं नातं!"