धनंजय मुंडेची मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक, काय आहे कारण ? मुंडेंनी स्वतः केले स्पष्ट..
धनंजय मुंडेची मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक, काय आहे कारण ? मुंडेंनी स्वतः केले स्पष्ट..
img
दैनिक भ्रमर
बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी  मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या हत्याकांडाच्या निषेधार्थ शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांनी बीडमध्ये महामोर्चा काढल्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रीपदही धोक्यात आले आहे. वाल्मिकी कराड हा देशमुख खून प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिकी कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे..अशातच आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध पाच खात्यांच्या सचिवांची बैठक बोलावली होती.  विविध विभागांच्या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या बैठकीबाबत स्वत: मुंडे यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.


दरम्यान , या बैठकीबाबत स्वत: मुंडे यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की, "मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या घेतलेल्या आढावा बैठकीत मी सहभागी झालो. आगामी १०० दिवसात विभागाने करावयाच्या कामांच्या नियोजन बाबत चर्चा झाली," अशी माहिती मुंडे यांनी दिली. तसंच स्मार्ट रेशन कार्ड वितरण, रास्त भाव दुकानांचे सक्षमीकरण असे ध्येय निश्चित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी काही मौलिक सूचना केल्या. त्याचबरोबर ग्राहकांचे हक्क व अधिकार याबाबत प्रचार प्रसिद्धी करून ग्राहकांच्या तक्रारींचे गतीने निराकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले, असंही त्यांनी सांगितलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group