बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका 25 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
चतु:शृंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. राजेश कांबळे (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राहुल शेषराव रिकामे (वय 20) आणि सय्यद जमीर उर्फ साहिल उर्फ बाब्या सय्यद नुर (वय 20) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी राहुल रिकामे याला राजेश याचे आपल्या बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून त्याने लोखंडी हत्यारांनी वार करत राजेश कांबळे याला ठार मारले. त्यानंतर त्याची गाडी वाकड येथील नदीमध्ये टाकून देत पुरावा नष्ट केला.
कोरोना वाढताच मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर; संबंधित विभागांना दिले "हे" निर्देश
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. अधिक तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.