गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना निवडणुकीत तिकीट नाही - गिरीश महाजन
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना निवडणुकीत तिकीट नाही - गिरीश महाजन
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक -  शहरातील गुंडगिरी चा विमोड कोणत्याही परिस्थितीमध्ये केला जाईल कोणालाही थारा दिला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका सरकारची आहे असे सांगून राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की,   अशी पार्श्वभूमी असलेल्या कोणत्याही उमेदवाराला भाजपाकडून तिकीट दिले जाणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले. 


राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे नाशिक मध्ये उत्तर महाराष्ट्राच्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी उपस्थित झाले होते त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, नाशिक शहरातील गुंडगिरीचा नायनाट करण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत आणि नाशिक शहर हे भयमुक्त करण्यासाठी सर्व प्रकारची कारवाई केली जात आहे. असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले की कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा लोकांना भाजपा थारा देणार नाही भाजपामध्ये जर अशा स्वरूपाची आहे काही कार्यकर्ते पदाधिकारी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तिकीट मागितले तर ते देखील त्यांना दिले जाणार नाही याबाबत पक्षाची भूमिका ही स्पष्ट आहे. 

'तो' VIDEO व्हायरल अन पोलीस अधिकाऱ्यासह ३ अंमलदार निलंबित

छोटा राजनच्या भावाने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की यावर आता उद्धव ठाकरे यांनी बोलले पाहिजे कारण त्यांच्या पक्षातील संजय राऊत यांना आमच्या पक्षामध्ये कोणीही प्रवेश केला तर तो गुन्हेगार आहे आम्ही त्याचे गुन्हे माफ करतो अशा स्वरूपाचं विधान करतात मग आता तुम्ही एवढ्या मोठ्या गुन्हेगाराच्या भावाला का घेतलं ते तुम्हाला चाललं का असा प्रश्न देखील उपस्थित करून एका प्रश्नाला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण कोणाबरोबर होतो कोणी काय केलं काय निकाल लागले हे सर्व कळणार आहे. 

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती एकत्र लढणार आहे यामध्ये कोणताही मतभेद नाही आमच्या तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आमच्या मध्ये कोणतेही वाद नाही असे त्यांनी सांगितले. जे कोणी अधिकारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना मदत करत असतील त्यांच्यावर ती देखील कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group