भीषण अपघात : मद्यधुंद चालकाने दुसऱ्या कारला उडवले ; वडिलांचा मृत्यू, लेकीसह पत्नी गंभीर ; कुठे घडली घटना?
भीषण अपघात : मद्यधुंद चालकाने दुसऱ्या कारला उडवले ; वडिलांचा मृत्यू, लेकीसह पत्नी गंभीर ; कुठे घडली घटना?
img
DB
राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे, नुकताच नवी मुंबई येथील पामबीच मार्गावर भीषण झाला आहे. पामबीच मार्गावर नेरुळ येथे रेनॉल्ट क्विड कारला पाठीमागून भरधाव थार गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी आणि 4 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर पळून गेलेल्या थार कार चालकाला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. नेरुळ पोलिसांनी त्या कार चालकाची चौकशी केली. या अपघातातील थार कार चालकाने मद्यदुंध अवस्थेत रेनॉल्ट क्विड कारला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे असं त्या चौकतून समोर आलं. 

या अपघातात मृत झालेल्या कार चालकाचे नाव मनीष पेडणेकर असून त्याची पत्नी स्नेहा आणि मुलगी अनन्या गंभीर जखमी आहेत. बेलापूरवरून ऐरोलीच्या दिशेने जाताना हा अपघात घडला असून थार कार चालक ओमकार विजय मोरे(वय २६) याने अपघातानंतर पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

विजय मोरे याच्या थार गाडीमध्ये एक बॉक्स बियरचे कॅन देखील आढळुन आले आहेत. त्यामुळे थार कार चालक ओमकार मोरे याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून हा अपघात केल्याची माहिती समोर आली आहे. दिवा येथे राहणारे मनीष पेडणेकर हे त्यांच्या कारने पत्नी स्नेहा आणि मुलगी अनन्या (वय ४) यांच्यासह पामबीच मार्गाने बेलापूरकडून वाशीकडे येत होते. 

त्यांची कार नेरुळ येथील सिग्नललगत आली असता पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. या अपघातात कारमधील तिन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यात मनीष याचा जागीच मृत्यू झाला आहे आणि त्यांची पत्नी आणि लहान मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा आणखी तपास पोलीस करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group