लग्नसोहळ्यातून परततना काळाचा घाला!  पुलावरुन कार कोसळली, तिघांचा मृत्यू , कुठे घडली घटना?
लग्नसोहळ्यातून परततना काळाचा घाला! पुलावरुन कार कोसळली, तिघांचा मृत्यू , कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
सांगली : सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळल्याची घटना घडली. रात्री एकच्या सुमारास कोल्हापूरवरून सांगलीकडे येताना हा अपघात घडला. अंकली नजीकच्या कृष्ण नदी पुलावरुन चारचाकी गाडी नदीपात्रात कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली आहे. तर या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

कोल्हापूर इथून लग्नकार्य आटपून सांगलीला परत येत असताना रात्री 1च्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडला, अशी माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील मृत व्यक्तींमध्ये प्रसाद खेडेकर (वय 40), प्रेरणा प्रसाद खेडेकर (वय 35) आणि वैष्णवी संतोष नार्वेकर (वय 23) या तिघांचा समावेश आहे. तर साक्षी संतोष नार्वेकर (वय 42), वरद संतोष नार्वेकर (वय 21) आणि समरजित प्रसाद खेडेकर (वय 5) अशी जखमींची नावं आहेत. हे सर्वजण सांगलीतील आकाशवाणी येथील गंगाधर कॉलनीमध्ये राहणारे असून सर्व कुटुंब लग्नकार्यासाठी कोल्हापूर इथे गेले होते.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरचा अपघात कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव हद्दीत घडला असल्यानं याची नोंद उदगाव पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. अपघातानंतर जखमींना सांगलीच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

खेडकर आणि नार्वेकर कुटुंब एकाच गाडीतून आपल्या नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी कोल्हापूर इथे गेले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास लग्नकार्य उरकून ते पुन्हा सांगलीकडं परतत असताना अंकली उदगाव येथे असणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलावरजवळ पोहोचताच गाडी चालवणारे प्रसाद खेडेकर यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि थेट गाडी सुमारे शंभर फूट खोल नदीपात्रात जाऊन कोसळली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group