महिनाभरातच मोडला संसार!  पतीचा अपघाती मृत्यू, पत्नीसह कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर
महिनाभरातच मोडला संसार! पतीचा अपघाती मृत्यू, पत्नीसह कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर
img
Dipali Ghadwaje
लग्नं हा प्रत्येक जोडप्यासाठी आनंदाचा क्षण असतो. वर-वधू त्यांच्या भावी आयुष्यासाठी कित्येक स्वप्न रंगवतात. पण दैवाचा खेळ काही वेगळाच असून शकतो. काहीतरी अघटित घडतं आणि सगळी स्वप्नं विस्कटतात. अशीच एक घटना अजमेरमधील मांगलियावास नजीकच्या गोला गावातमध्ये घडली.  तेथे एका जोडप्याचं अवघ्या महिन्याभरापूर्वी लग्न झालं. घरात आनंदाचं वातावरण होतं, पण क्षणात असं काही झालं ज्याने संपूर्ण घर दु:खात बुडालं. महिन्यापभरापूर्वी लग्न झालेल्या त्या तरूणाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. 

अजमेरमधील मांगलियावास नजीकच्या गोला गावात दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा कारने धडक दिल्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गोला येथील पृथ्वीराज खेडा येथील भैरू गुर्जर यांचा मुलगा संजय (26) हा मोटारसायकलवरून त्याच्या गावाकडे येत होता. दरम्यान, गोला गावात त्याला भरधाव कारने धडक दिली. 

त्यामुळे तो रस्त्यावर पडला. तेथून जाणाऱ्या ग्रामस्थांनी त्याला पिसांगण येथील रुग्णालयात नेलं. रूग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अपघातानंतर कार चालकाने आपल्या वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला.
 
अपघाताची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयताचा मेहुणा गोपाल गुर्जर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी बुधवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

गोला येथील रहिवासी बबलू गुर्जर, पटवारी पोलुराम आणि रामनाथ गुर्जर यांनी पत्रिका डॉट कॉमसोबत बोलताना सांगितलं की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या संजयचे एक महिन्यापूर्वीच १३ फेब्रुवारी रोजी लग्न झालं होतं. लग्नात वधू-वरांच्या हातावर लावलेली मेहंदीही निघाली नाही, तेच त्यांचा संसार उद्धस्त झाला. या अपघातामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, संजयच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. संजय कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष होता. आता त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पश्चात आई आणि बायको उरली आहेत. संजयला दोन बहिणीही आहेत. संजयच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. लग्नाच्या महिनाभरातच त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. पतीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे पत्नीसह कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group