रिल्स बनवतांना झाला घात; रिल्सच्या नादात गमावला जीव
रिल्स बनवतांना झाला घात; रिल्सच्या नादात गमावला जीव
img
Jayshri Rajesh
रील्स बनवण्याच्या नादात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यात घडलीये. श्वेता दिपक सुरवसे ही तरुणी तिच्या मित्राबरोबर सुलीभंजन इथं दत्तधाम मंदिर परिसरात रील बनवत होती. तिला कार चालवता येत नव्हती. मी पण आज कार चालवून पाहते असं ती मित्राला म्हणाली. कार रिव्हर्स गिअरमध्ये असताना तिचा पाय अॅक्सिलरेटरवर अधिक दाबानं पडला, त्यामुळे कार डोंगराच्या कडेला जाऊन दरीत कोसळली.

यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. मुळात, कार चालवता येत नसेल तर कधीच तसा प्रयत्न करू नये. त्यातही नवीन ठिकाणी जाऊन डोंगराच्याकडेला कार रिव्हर्समध्ये टाकणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखंच आहे, जे दुर्दैवानं श्वेताच्या बाबतीत खरं ठरलं.

श्नेता आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे हे छत्रपतीसंभाजीनगर येथून  सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले.  या ठिकाणी मोबाईलवर रिल्स बनवतांना तिने मित्राला सांगितले की,  मीपण कार चालवून बघते. रिव्हर्स गिअर पडून,एक्सलेटरवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन  खाली गेली यामध्ये या युवतीचा मृत्यू झाला.

सुलीभंजन येथील दत्त मंदिराराचा परिसर विहंगम असून,पावसाळ्यात तो निसर्ग सौंदर्यांने अधिक खुलतो त्यामुळे भाविक ,पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. अशातच हे दोघेजण 17 जूनला फिरायला आले. मोबाईलवर रिल्स बनवत असताना घात झाला. मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षण स्थळावर कठडे असते तर ही घटना घडली नसती अशी चर्चा होती. 

रिल्स बनवण्याचा मोह न आवरता येणारा 

सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्ध होणाऱ्यांची संख्या फार आहे. काहीतरी स्टंट करायचा किंवा हुल्लडबाजी करुन प्रसिद्ध होण्याचं फॅड वाढत आहे. त्यामुळे अनेक रिल्स स्टार वेगवेगळे स्टंट करतात. अनेकदा जीवाला धोकादेखील निर्माण होऊ शकतो हे माहित असूनही अनेक लोक प्रसिद्धीसाठी असे घातक असणारे रिल्स करतात. या रिल्सच्या नादात अनेकदा अनेकांनी आपले जीवही गमावले आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group