मोबाईल खेळताना किंवा रील्स बनवण्याच्या नादात अनेक वेळा अपघात होत असतात. यात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. तरीही यातून कोणताही धडा न घेता लोक आपला जीव धोक्यात टाकून रील्स बनवण्याची आपली हौस पूर्ण करत असतात. असाच रील्स बनवण्याचा स्टंट एका कुटुंबाच्या जिवावर बेतला असून यात पती - पत्नीसह 3 वर्षांच्या चिमूकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
रेल्वे रुळावर उभं राहू पती-पत्नी आपल्या तीन वर्षांच्या मुलासह रिल्स बवनत होते. त्याचवेळी वेगाने येणाऱ्या ट्रेनने जोरदार धडक दिली आणि यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्देवी घटना उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर इथली आहे. लखनऊ-पीलीभीत रेल्वे मार्गावर बुधवारी ट्रेनच्या धडकेत पती-पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पती आणि पत्नी आपल्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन रेल्वे रुळाच्या बाजूला उभं राहून मोबाईलवर रिल्स बनवत होते. त्याचवेळी लखनऊकडून येणाऱ्या ट्रेनने पती-पत्नीला जोरदार धडक दिली. पती-पत्नी रिल्स बनवण्यात इतके मग्न होते, की मागून वेगाने येणाऱ्या ट्रेनचंही त्यांना भान राहिलं नाही. त्यांच्याबरोबर 3 वर्षांच्या चिुमरड्याचाही नाहक बळी गेला.
रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेलं कुटुंब हे सीतापूर जिल्ह्यातील लहरपूर गावातील होते. मृतांमध्ये 30 वर्षांच्या अहमद, पत्नी नाजनी (25) आणि तीन वर्षांचा मुलगा अकरम यांचा समावेश आहे. ओयल रेल्वे स्थानका जवळच ही दुर्देवी घटना घडली.
कसा घडला अपघात?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लहरपूर गावात राहाणारा अहमद, पत्नी नाजनीन आणि मुलगा अकरम यांच्याबरोबर फिरण्यासाठी बाहेर पडला. फिरता-फिरता ते ओयल रेल्वे स्थानकाजवळ पोहोचले. रेल्वे रुळाजव अहमद आणि नाजनीन यांनी रिल्स बनवण्याचं ठरवलं. अहमदने आपल्या मोबाईलने रिल्स बनवायला सुरुवात केली. त्यावेळी चिमुरडा नाजनीनच्या हाताता होता. यादरम्यान लखनऊ-पीलीभीत पॅसेंजर येत होती. पण या दोघांनाही त्याचं भान नव्हतं. यावेळी ट्रेनच्या धडकेत तिघांचाही दुर्देवी मृत्यू झाला.