२५ एप्रिल २०२६
खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रातून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा शनिवार आणि रविवार अत्यंत कठीण ठरणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात तिसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी आणि खर्डी यार्डच्या तांत्रिक पुनर्बांधणीसाठी तब्बल २७ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे.
या मेगाब्लॉकमुळे खान्देशची जीवनवाहिनी समजली जाणारी 'धुळे एक्स्प्रेस' रद्द करण्यात आली असून, पंजाब मेल, मंगला आणि देवगिरी यांसारख्या महत्त्वाच्या गाड्या चक्क नंदुरबार आणि पुण्यामार्गे वळवण्यात आल्या आहेत.
ऐन सुट्ट्यांच्या काळात आणि कडक उन्हाळ्यात रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने हजारो प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. विशेष म्हणजे, सुट्ट्यांचा काळ असल्याने रेल्वेत मोठी गर्दी असतानाच हा ब्लॉक आल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.
पंजाब मेल, मंगला आणि देवगिरी यांसारख्या महत्त्वाच्या गाड्या चक्क जळगाव-नंदुरबार आणि पुण्यामार्गे वळवण्यात आल्या आहेत, तर मुंबईतून सुटणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळेत ५ ते १० तासांचा मोठा बदल करण्यात आला आहे.
ऐन उन्हाळ्यात रेल्वेचे हे कोलमडलेले वेळापत्रक प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहणारे ठरणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या गाडीचे नवे लोकेशन आणि वेळ तपासणे आता अनिवार्य झाले आहे. तुम्ही जळगाव, भुसावळ किंवा धुळ्याहून मुंबईकडे जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कल्याण-कसारा स्थानकांदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम आणि खर्डी यार्डच्या पुनर्बांधणीसाठी २५ आणि २६ एप्रिल रोजी विशेष 'ट्रॅफिक ब्लॉक' घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे खान्देशातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून, प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे.
धुळे एक्स्प्रेस रद्द, प्रवाशांची मोठी गैरसोय
या ब्लॉकचा सर्वात मोठा फटका खान्देशच्या प्रवाशांना बसला आहे. २५ एप्रिल रोजी धावणारी गाडी क्रमांक ११०११/१२ सीएसएमटी-धुळे-सीएसएमटी एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. सुट्ट्यांचे दिवस असल्याने अनेक प्रवाशांनी आधीच आरक्षित केलेली तिकिटे रद्द झाल्याने मोठी पंचाईत झाली आहे.
जळगाव-नंदुरबार आणि पुण्यामार्गे वळवल्या गाड्या
कल्याण-कसारा मार्ग बंद असल्याने अनेक गाड्या लांबच्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रवासाचा वेळ ५ ते ६ तासांनी वाढणार आहे: नंदुरबार-वसई रोड मार्ग: गोरखपूर-LTT (२२५३७) आणि कानपूर-LTT (०४१५१) या गाड्या जळगाव-नंदुरबार-वसई रोड मार्गे धावतील. पुणे-लोणावळा मार्ग: बनारस-LTT आणि जयनगर-LTT या गाड्या मनमाड-पुणे-लोणावळामार्गे मुंबईकडे जातील.
पंजाब मेल: सीएसएमटी-फिरोजपूर पंजाब मेल (१२१३७) ठाणे-वसई रोड-नंदुरबार-जळगाव मार्गे वळवण्यात आली आहे.
मंगला एक्स्प्रेस: एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेसचा कसारा येथील थांबा रद्द करण्यात आला असून, ही गाडी पनवेल-भिवंडी रोड-जळगाव मार्गे धावेल. कानपूर विशेष (०४१५२): ही गाडी सायंकाळऐवजी चक्क दुसऱ्या दिवशी पहाटे ४:३० वाजता सोडली जाईल.
भुसावळ विभागात गाड्या थांबणार मुंबईकडे येणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, शालीमार एक्स्प्रेस आणि नागपूर-मडगाव स्पेशल या गाड्यांना भुसावळ विभागात १५ ते ३० मिनिटे रोखून धरले जाईल. गाड्या एकामागून एक सोडल्या जाणार असल्याने त्या विलंबाने धावतील.
पायाभूत सुविधांची देखभाल आणि रेल्वे सुरक्षा कामासाठी हा ब्लॉक अत्यावश्यक आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी अधिकृत रेल्वे ॲप किंवा चौकशी खिडकीवर वेळापत्रकाची खात्री करावी," असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी केले आहे.
Copyright ©2026 Bhramar