कार व कंटेनरच्या भीषण अपघातात 5 तरुण ठार; मनमाडच्या अनकवाडे शिवारातील घटना
कार व कंटेनरच्या भीषण अपघातात 5 तरुण ठार; मनमाडच्या अनकवाडे शिवारातील घटना
img
दैनिक भ्रमर

येवला प्रतिनिधी (दीपक सोनवणे) :- मनमाड जवळील अनकवाडे रेल्वे उड्डाण पुलावर कंटेनर-स्विफ्ट कारची समोरा समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 5 तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

रोहित धनवटे, श्रेयस धनवटे ,ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक असे अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नाव असून पाचही तरुण नाशिकचे रहिवाशी आहेत.

मनमाडजवळच्या कुंदलगाव येथील म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रम उरकून येवला मार्गे नाशिककडे परतत असतांना हा भीषण अपघात झाला. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. मृतांचे शव मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

अवकाळी पाऊसामुळे मदतकार्य राबविण्यास अडथळा येत होता. रस्त्याच्या मधोमध हा अपघात झाल्याने या मार्गावरची वाहतूक संथ गतीने सुरू होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group