शेतकऱ्यांनो काळजी घ्या! कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊन तरुणाचा मृत्यू
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊन तरुणाचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी केल्यावर त्वचेवाटे विषबाधा झालेल्या २८ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रोहित बाबासाहेब थेटे असे मृत तरुणाचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील तरुण रोहित थेटे हा आई- वडील व पत्नीसोबत सावखेडगंगा शिवारात शेतवस्तीवर राहतो. रविवारी रोहित शेतातील पिकावर विषारी औषध फवारणी करण्यासाठी गेला होता. शेतामध्ये औषध फवारत असताना त्वचेवाटे औषध शरीरात गेल्याने त्याला विषबाधा झाली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रोहितला तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु सोमवारी (१७ जून) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

या दुर्दैवी घटनेने थेटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी विरगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group