अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा बँकेचा ताबा 'या' बँकेकडे
अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा बँकेचा ताबा 'या' बँकेकडे
img
DB
नाशिक: नियमबाह्य कर्जवाटप आणि राजकीय हस्तक्षेप तसेच थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा बँकेचा ताबा राज्य सहकारी बँक घेणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल मुंबईत बैठक झाली. या वेळी हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे.



दरम्यान यासंदर्भात चार तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज पुणे येथे होणार आहे. त्यात पुढील दिशा ठरेल. या समितीत प्रतापसिंग चव्हाण, सहकार आयुक्त अनिल कवडे, संतोष पाटील, विद्याधर अनासकर यांचा समावेश आहे.

यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. आमदार हिरामण खोसकर यांसह विविध पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group