मोठी बातमी : नाशिक जिल्ह्यात ३६०० हेक्टर क्षेत्राचा बोगस पीक विमा ; शेतकऱ्यांनी उतरविलेला विमा होणार रद्द
मोठी बातमी : नाशिक जिल्ह्यात ३६०० हेक्टर क्षेत्राचा बोगस पीक विमा ; शेतकऱ्यांनी उतरविलेला विमा होणार रद्द
img
Dipali Ghadwaje
मोठी बातमी समोर येत आहे. बोगस पिक विमा उतरवलेल्या शेतकर्‍यांचा विमा रद्द करण्याची सूचना कृषी विभागाने दिली आहे. खरीप हंगामात शेतकर्‍यांनी पीक लागवड न करता पिक विमा उतरवल्याचा निदर्शनास आले होते. यामध्ये कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा आकडा सर्वाधिक मोठा होता. नाशिक जिल्ह्यात 5172 शेतकऱ्यांनी 3600 हेक्टर क्षेत्रावर बोगस पिक विमा उतरला होता.
 
बोगस पीक विमा प्रकरणात कृषी विभागाने नाशिक जिल्ह्यातील 5172 शेतकर्‍यांवर ठपका ठेवला आहे. त्यांनी 3600 हेक्टर क्षेत्रावर बोगस पिक विमा उतरला होता. कृषी विभागाने विमा कंपन्यांना बोगस पिक विमा उतरवल्या शेतकर्‍यांचा विमा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बोगस पिक विमा उतरवलेल्या शेतकर्‍यांचा विमा रद्द करण्यात आल्याची माहिती नाशिकचे उपसंचालक कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
 
कृषी विभागाच्या पडताळणीनंतर सरकारच्या तिजोरीचा कोट्यवधी रूपयांचा भुर्दंड वाचला. बोगस पिक विमा उतरवणाऱ्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा सर्वाधिक असल्याचं कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे.

कमी क्षेत्रावर लागवड झालेली नसल्याचा शेतकर्‍यांनी न कळवल्याने ही बाब समोर आली. बोगस पिक विमा चा प्रकार उघडकीस आल्यानंतर येणाऱ्या काळात कृषी विभाग पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून CSC सेंटरला भेटी देणार आहे. कृषी विभाग त्यांच्या पिक विमा उतरवल्याची पडताळणी करणार आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group