शेतकऱ्यांसाठी खुशखबर; 'या' तारखेला खात्यात जमा होणार 2000 रुपये
शेतकऱ्यांसाठी खुशखबर; 'या' तारखेला खात्यात जमा होणार 2000 रुपये
img
Dipali Ghadwaje
निवडणुकीची धामधूम संपली असून आचारसंहिता शिथील झाली आहे. पावसाळा सुरू झाल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. बियाणे तसेच खते खरेदी करण्यासाठी बळीराजाला पैशांची चणचण भासत आहे. हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

पीएम किसान सन्मान योजनेचा १७ वा हप्त्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती आहे. पीएम किसान योजना ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी तीन ६००० रुपयांची मदत केली जाते. प्रत्येकी २००० अशा तीन टप्प्यात पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. योजनेचा मागील म्हणजेच १६ वा हप्ता २८ फेब्रुवारी २०२४ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. 

त्यानंतर जवळपास ४ महिन्यांचा कालावधी लोटला, तरी १७ वा हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे आता पुढील हप्त्याचे पैसे कधी मिळणार? याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतला.

पेरणीचा हंगाम तोंडावर असताना पंतप्रधानांनी १७ वा हप्ता जारी करण्यासाठी फाईल पास केली. आता या हप्त्याचे पैसे लवकरच खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ जूनपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येतील. ज्यामुळे पेरणीला मोठी मदत होईल.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group