शेतकऱ्यांचं चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलन
शेतकऱ्यांचं चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलन
img
Dipali Ghadwaje
 गेल्या काही दिवसांपासून कांदा दरावरुन नाशिकसह राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एकीकडे सरकार म्हणतंय हे शेतकऱ्यांचे सरकार, मात्र दुसरीकडे गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. कांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अशातच केंद्र शासनाने कांदा निर्यात मूल्य 40% केल्याच्या निषेधार्थ आज सकाळी चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलन केले आहे. 

दरम्यान या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती, या आंदोलनात शिरीषकुमार कोतवाल संजय जाधव विजय जाधव नितीन आहेर कारभारी आहेर डॉ सयाजीराव गायकवाड गणेश निंबाळकर संपतराव वक्ते सर्वपक्षीय नेते तसेच शेतकरी सहभागी झाले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group