ऐन दिवाळीत 'लालपरी' थांबणार ? कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा, प्रमुख मागण्या नक्की आहे तरी काय ?
ऐन दिवाळीत 'लालपरी' थांबणार ? कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा, प्रमुख मागण्या नक्की आहे तरी काय ?
img
दैनिक भ्रमर
वेतनात वाढ, महागाई भत्ता यांसह अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ एसटी कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत लालपरी थांबली तर प्रवाशांचे मोठे हाल होणार आहे. एसटी कामगारांनी आंदोलन करण्याची नोटीस परिवहनमंत्र्यांसह एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांना दिली. १३ ऑक्टोबरपासून एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर धरणे केली जाणार आहे. 

या धरणे आंदोलनाची दखल एसटी प्रशासनाने घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. एसटी महामंडळांतर्गत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, एसटी कामगार सेनेचे हि. प्र. रेडकर यांच्यासह अनेक संघटनांनी संयुक्त नोटीस २४ सप्टेंबर रोजी बजाविण्यात आली आहे.

यंदाच्या पावसाळी अधिवेशनात एसटी महामंडळामध्ये २५ हजार कायम कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ३६ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाचे खासगी करणाचा निर्णय झाल्याचा संकेत दिसत आहेत. यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या कंत्राटी भरतीला एसटी कामगारांचा विरोध आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या...

एसटी महामंडळाने कंत्राटी कामगारांच्या ऐवजी नियमित कर्मचाऱ्यांची भरती करावी. 

पीपीपी मॉडेल अंतर्गत जागेचा विकास करण्याऐवजी महामंडळाने स्वतः जागेचा विकास करावा

एसटी कामगारांना दिवाळी निमित्त १५ हजार रुपये दिवाळी भेट देण्यात यावी.

एसटी कामगारांना कामगार कराराच्या तरतुदीनुसार १२ हजार ५०० रुपयांची उचल द्यावी.

निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची थकीत देणी एकरकमी देण्यात यावी.

निवृत्त कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना नऊ महिन्यांऐवजी एक वर्षाचा मोफत पास द्यावा, त्याअंतर्गत सर्व बसमध्ये प्रवास करण्याची सुविधा देण्यात यावी.

४ सप्टेंबर २०२४ ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेलया बैठकीत एसटी कामगारांच्या मुळ वेतनात ६५०० ची वाढ करण्यात आली. मात्र १ एप्रिल एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या कालावधीची थकबाकी देण्यात आलेली नाही.

वर्ष २०१८ पासून महगाई भत्ता देण्याबाबत औद्योगिक न्यायलयाने आदेश दिल्यानंतरही महागाई भत्याची थकबाकी कामगारांना देण्यात आलेली नाही.

एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीच्या वार्षिक वेतनवाढीच्या एक टक्के वाढीव दराची व घरभाडेभत्याची वाढीव दराची थकबाकी अद्याप प्रलंबित आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणार महगाई भत्ता त्याच दराने व त्याच तारखेपासून एसटी कामगारांना लागू करण्याचे मान्य केलेले आहे. हा निर्णय अजूनही एसटी महामंडळाने लागू केला नाही.



इतर बातम्या
Join Whatsapp Group