मुंबई : राज्यभरातील एसटीच्या विविध संघटनांनी पुकारलेला संप आणखी चिघळला आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी कृती समितीची बैठक निष्फळ झाली. या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कृती समितीनं हा संप सुरुच ठेवण्याचा निर्धार कृती समितीनं व्यक्त केला आहे.
दरम्यान ऐन गणेशोत्सवात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी संप मागे घेण्याची विनंती उदय सामंत यांनी घेतली होती. मात्र मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संपावर ठाम राहणार असल्याची भूमिका एसटी कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघू शकला नाही.
मुख्यमंत्री तोडगा काढणार का?
उद्या (बुधवार, 4 सप्टेंबर) संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समिती चर्चा करणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री या संपाबाबत काय भूमिका घेणार? मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर संपावर तोडगा निघणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय आहेत एसटी कर्मचारी संघटनांच्या मागण्या?