एसटीनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी : आजपासून तिकीट दरांमध्ये
एसटीनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी : आजपासून तिकीट दरांमध्ये "इतके" टक्के सूट
img
Dipali Ghadwaje

एसटी तिकिटाचं आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून तिकीट दरांमध्ये 15 टक्के सूट मिळणार आहे. दीडशे किमीपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या आणि सवलतधारक प्रवासी वगळून इतर प्रवाशांना ही सुविधा दिली जाणार  आहे. ही योजना दिवाळी आणि उन्हाळी हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे.  महामंडळाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ही घोषणा केलीय.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) १ जुलै २०२५ पासून १५० किमीपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ तिकीट बुकिंगवर १५% सवलत जाहीर केली आहे.

परिवहनमंत्री प्रताप सरनाइक यांनी ही योजना एमएसआरटीसीच्या ७७व्या स्थापना दिनी (१ जून) जाहीर केली होती. ही सवलत सर्व प्रकारच्या बससाठी, शिवनेरीसह, लागू असेल, परंतु फक्त पूर्ण तिकीट घेणाऱ्या प्रवाशांसाठी आहे.

प्रवासी तिकीट खिडकी, एमएसआरटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर, किंवा मोबाइल ॲपद्वारे बुकिंग करू शकतात. आषाढी एकादशी (६ जुलै) आणि गणेशोत्सवासाठी पंढरपूर, कोकण प्रवास करणारे ही या योजनेचा लाभ घेऊ शकतील. मात्र, पीक सीझनमध्ये ही सवलत लागू होणार नाही.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group