एसटी महामंडळाला फटका, 2200 बसेसची खरेदी रखडली ;
एसटी महामंडळाला फटका, 2200 बसेसची खरेदी रखडली ; "हे" आहे कारण
img
Dipali Ghadwaje
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्चला पत्रकार परिषद देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आणि वेळापत्रक जाहीर केले होते. लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्यापासून देशभरात तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. या काळात आता सरकारला कोणतेही नवे धोरणात्मक निर्णय, प्रकल्पांची घोषणा किंवा भूमिपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम घेता येणार नाहीत. परिणामी आचारसंहितेच्या काळात प्रशासकीय निर्णय आणि नवी विकासकामे हाती घेण्याची  पक्रिया जवळपास ठप्प होते. महाराष्ट्रातही याच कारणामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला आहे.

राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पात मंजूर केलेली 900 कोटी रुपयांची रक्कम एसटी महामंडळाला मिळालीच नसल्याचे समोर आले आहे. या 900 कोटी रुपयांच्या निधीचा वापर करुन एसटी महामंडळाकडून 2200 नव्या बसगाड्यांची खरेदी केली जाणार होती. मात्र, देशभरात लागू झालेली आचारसंहिता आणि राज्य सरकारच्या अनास्थेपायी प्रवाशांना जुन्याच गाड्यांची प्रवास करावा लागणार आहे. 15 वर्षे होऊन गेलेल्या जवळपास एक हजार गाड्या स्क्रॅपिंगसाठी आलेल्या असतानाही नव्या गाड्या दाखल होण्यास उशीर होत आहे. 

त्यामुळे एसटी महामंडळाकडून नव्या बसेसची खरेदी केली जाणार होती. परंतु, अर्थसंकल्पात तरतूद केलेला 900 कोटीचा निधी महामंडळाला मिळू शकला नाही. अशातच आता लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्याने पुढील किमान तीन महिने नव्या बसगाड्यांची खरेदी अडकून पडणार आहे. सोबतच, एसटी महामंडळाने कंत्राट दिलेल्या ईव्ही गाड्यांना येण्यास देखील अवधी लागणार आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group