नाशिकमध्ये बर्निंग बसचा थरार, धावत्या एसटी बसने घेतला अचानक पेट
नाशिकमध्ये बर्निंग बसचा थरार, धावत्या एसटी बसने घेतला अचानक पेट
img
Dipali Ghadwaje
नाशिक :  रस्त्यावरील धावत्या वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच नाशिकमध्ये पुन्हा एकदा धावत्या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. एसटी महामंडळाच्या सटाणा-प्रतापूर  बसने  अचानक पेट घेतला. यावेळी बसमध्ये एकूण ३५ ते ४० प्रवासी होते. या घटनेने  एकच खळबळ उडाली आहे

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर ही घटना घडली. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावरून ही बस निघाली होती. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्यात या बसने अचानक पेट घेतला. खिरमणी फाट्यावर बस थांबल्यानंतर या बसला आग लागली.  या बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. बसला अचानक आग लागल्यानंतर बसमधील प्रवासी खाली उतरले. सर्व प्रवासी बसमधून खाली उतरल्यानंतर या बसची आग वाढली.

नक्की काय घडले ? 

बसने अचानक पेट घेतल्यानंतर प्रवासी तातडीने गाडीतून बाहेर पडले. बसला आग लागल्यानंतर एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे बसमधील प्रवासी बचावले. आग लागल्यानंतर बस चालकाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग विझली नाही. त्यानंतर काहींनी अग्निशमन दलाला माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येईपर्यंत बस पूर्णत: जळून खाक झाली होती. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

 

 
इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group