आनंदाची बातमी : नवीन वर्षातील पहिल्या संकष्टीला घ्या अष्टविनायकाचे दर्शन ; भरा फक्त
आनंदाची बातमी : नवीन वर्षातील पहिल्या संकष्टीला घ्या अष्टविनायकाचे दर्शन ; भरा फक्त "इतके" पैसे
img
Dipali Ghadwaje
यंदा एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी खास सुविधा आणली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाकडून संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने 17 जानेवारीला पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनाकरिता विशेष बस सोडण्यात येणार आहे. 

17 जानेवारीला पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनाकरिता विशेष बस सोडण्यात येण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईन आरक्षण सुविधा खुली करण्यात आली आहे. ही विशेष बस 17 जानेवारीला सकाळी सात वाजता सुटणार असून प्रौढांसाठी 990 रुपये ते 1005 रुपये तर मुलांसाठी 500 ते 505 रुपयांपर्यंत तिकीट दर असणार आहेत
 
नागरिकांना ओझर इथं भक्ती निवासामध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय असणार आहे. मात्र त्याचे पैसे भाविकांना द्यावे लागणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आल आहे. ही सुविधा पुण्याच्या शिवाजीनगर बस डेपो मधूनही असणार आहे.

अष्टविनायक यात्रेसाठी बुकिंग करायचे झाल्यास तुम्ही www msrtc.gov.in या संकेतस्थळावरुन बुकिंग करु सकता. भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असं अवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. 

अष्टविनायक यात्रा कशी आहे?

अष्टविनायक दर्शनासाठी सर्वोत्तम मार्ग मोरगाव येथील मयुरेश्वर येथून सुरू होतो, त्यानंतर सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव येथे यात्रा संपते. तसंच असं म्हणतात की, अष्टविनायका मंदिरांना भेट देण्यासाठी हिवाळ्यातील नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे कारण सूर्यकिरणांच्या दिशेमुळे मूर्तींचे खरे तेज पाहता येते. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group