बस कुठपर्यंत पोहोचली ? आता मोबाइलमधूनच जाणून घ्या ! आता प्रवाशांना मिळणार MSRTC बसेसचं रिअल-टाइम अपडेट्स
बस कुठपर्यंत पोहोचली ? आता मोबाइलमधूनच जाणून घ्या ! आता प्रवाशांना मिळणार MSRTC बसेसचं रिअल-टाइम अपडेट्स
img
वैष्णवी सांगळे
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बसच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 'आपली एसटी' हे अॅप 
सुरु झाले. ज्या माध्यमातून बसेसचं रिअल-टाइम अपडेट्स मिळणार आहेत. 


अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही हे दोन्ही युझर्स हे अॅप वापरू शकतील. जवळचा बस स्टॉप शोधणे, दोन स्टॉपमधील वेळापत्रक तपासणे, सेवा किंवा तिकीट क्रमांक वापरून थेट बस ट्रॅकिंग करता येईल. एका-क्लिकने आपत्कालीन संपर्क क्रमांकावर कॉलिंग करता येईल. दरम्यान या अॅपमध्ये सध्या १२,००० हून अधिक बसेसचा लाईव्ह डेटा उपलब्ध आहे. लवकरच सर्व बसेसमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात एसटीचा प्रवासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यात महिलांना बस भाड्यात मिळणाऱ्या सुटीमुळे महिलांचा बसमध्ये प्रवास वाढला आहे. पण अनेकवेळा महिलाआणि प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत बस स्टॉपवर उभं रहावं लागतं. बस नेमकी कुठे आहे कधी पोहचणार याची योग्य माहिती मिळत नसल्यानं प्रवाशांमध्ये चीडचीड पहायला मिळते. प्रवाशांच्या या समस्येची दखल घेत MSRTCनं एक खास सुविधा सुरू केलीय. 

आता 'आपली एसटी' या अॅपच्या मदतीनं बस कुठे आहे कोणत्या स्थानकात आहे, याची माहिती मिळणार आहे. मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे प्रवासी बसेसचे अचूक स्थान ट्रॅक करू शकणार आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर हे अॅप औपचारिकपणे लाँन्च करण्यात आलं. याबाबतची माहिती परिवहन मंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

रोझमेर्टा ऑटोटेक लिमिटेडच्या सहकार्याने विकसित केलेल्या या अ‍ॅपने महाराष्ट्रातील १२,००० हून अधिक बसेस आणि १ लाखाहून अधिक मार्गांचे मॅपिंग करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे प्रवाशांना बस सुटण्याच्या वेळा (STD) आणि अंदाजे आगमन वेळा (ETA) सारखी रिअल-टाइम माहिती मिळू शकते. यामुळे प्रवाशांना थांब्यांवर जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही आणि बस उपलब्धतेनुसार थेट पोहोचता येईल.

आगाऊ जागा आरक्षित करणाऱ्या प्रवाशांसाठी लाईव्ह ट्रॅकिंगसह तिकीट बुकिंग इंटिग्रेशन देखील विकसित केले जाणार आहे. ‘आपली एसटी’ (मराठी नाव म्हणजे आमची एसटी) बस प्रवास अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि प्रवाशांसाठी अनुकूल बनवेल. तसेच यात अजून काही सुधारणा असेल तर प्रवाशांनी अभिप्राय द्यावेत असं आवाहन परिवहन मंत्र्यांनी केलंय.


MSRTC |
इतर बातम्या
Join Whatsapp Group