नाशिक - निफाड रोडवर बर्निंग शिवशाहीचा थरार
नाशिक - निफाड रोडवर बर्निंग शिवशाहीचा थरार
img
दैनिक भ्रमर
येवला (दीपक सोनवणे) :- नाशिक निफाड रोडवर चांदोरी शिवारात शिवशाही बसने घेतला अचानक पेट घेतला. या घटनेत प्रवासी सुखरूप आहेत.

छत्रपती संभाजीनगर डेपोची शिवशाही नाशिकहून
छत्रपती संभाजीनगर येथे येत असताना चांदोरी शिवारामध्ये बसला अचानक आग लागली. यावेळी चालक व वाहकाने प्रवाशांना सुखरूप खाली उतरवून अग्निशमन दला ला पाचारण केले. मात्र तोपर्यंत संपूर्ण बस ही आगीचे विळख्यात सापडून खाक झाली होती.

दरम्यान यात कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाला.  शिवशाही बस अनेकवेळा पेट घेत असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
nasik | MSRTC |
इतर बातम्या
Join Whatsapp Group