भुजबळांना धमकी देणाऱ्या इसमास औरंगाबाद येथून अटक
भुजबळांना धमकी देणाऱ्या इसमास औरंगाबाद येथून अटक
img
Dipali Ghadwaje


सिडको :- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी ब्राह्मण समाजाबाबत वक्तव्य केले होते. याबाबत ब्राह्मण समाजाच्या वतीने त्यांचा या वक्तव्याच्या निषेध करण्यात आला होता. दरम्यान, एका अनोळखी इसमाने काल दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर मेसेज व व्हाट्सअप वरुन शिवीगाळ गेली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंबादास खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनोळखी संशयिता विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंद्रनील विभास कुलकर्णी (वय 44, रा. औरंगाबाद) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने औरंगाबाद येथून ताब्यात घेतले.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर काल दुपारी चार वाजेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने ९४२२२२२०१२ या क्रमांकावरून त्यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज केला. त्यांनी सदरचा क्रमांक हा ब्लॉक केला असता परत वीस-पंचवीस मिनिटांनी त्यांना व्हाट्सअपवर कॉल करून शिवीगाळ केली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंबादास खैरे (वय ४४)  यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिता विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group