त्र्यंबकेश्वर परिसरात परदेशी विद्यार्थ्यांची झडती
त्र्यंबकेश्वर परिसरात परदेशी विद्यार्थ्यांची झडती
img
दैनिक भ्रमर


नाशिक (प्रतिनिधी):- नााशिकमध्ये सध्या एमडी ड्रग्जचा सुळसुळाट आहे. तसेच शहरालगतच्या काही शिक्षणसंस्थांमध्ये परदेशातून विद्यार्थी येत असल्यामुळे त्यांच्यामार्फतही एमडी ड्रग्ज रॅकेट चालविले जात असल्याची चर्चा सुरू असल्याने त्र्यंबकेश्वर पोलिसांनी परदेशी विद्यार्थ्यांना लक्ष करीत त्यांची कसून झडती घेत चौकशी सुरू केली आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांमध्ये परदेशातील विद्यार्थी शिक्षण घेतात, हे विद्यार्थी परिसरात अंमली पदार्थ बाळगत असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकचे पोलीस निरीक्षक बीपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिरावणी परिसरातील परदेशी विद्यार्थ्यांची व त्यांच्या घरांची झडती करून तपासणी करण्यात आली.

३५ परदेशी विद्यार्थी राहत असलेल्या घरांची तपासणी करण्यात आली. त्यात काही आक्षेपार्ह काही आढळून आले नाही. त्याचप्रमाणे त्र्यंबक रस्त्यावरील बहुतांश हॉटेल, लॉजबाबत तक्रारी आल्या असता त्यांचीही कसून तपासणी करण्यात आली. ही कारवाई ग्रामीण पोलिसांकडून सातत्याने केली जाणार आहे. परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांबाबत नागरिकांनी नाशिक ग्रमाीण पोलिसांशी हेल्पलाईन क्रमांक ६२६२२५६३६३ यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group