मराठा आरक्षणासाठी त्र्यंबक तालुक्यात रास्ता रोको
मराठा आरक्षणासाठी त्र्यंबक तालुक्यात रास्ता रोको
img
दैनिक भ्रमर


त्र्यंबकेश्वर (सतीश दशपुत्रे) :- सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना अंतरवली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करत असताना त्यांना पाठिंबा म्हणून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तुपादेवी फाटा  येथे शांततेत  रस्ता रोको करत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

यावेळी तालुक्यातील सकल मराठा समुदाय जमला होता. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्कच आशा घोषणा देण्यात आल्या. तसेच शासनाने लवकरात लवकर मराठा समाजच्या आरक्षणाचा मुद्दा सोडवावा व अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या अनुत्तरित राहिलेला प्रश्न मार्गी लावावा, अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार श्वेता संचेती यांना देण्यात आले.

 तसेच गेल्या पाच सहा दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असताना त्यांना पाठिंबा देत  व  पुढील नियोजन सकल मराठा समाजाच्या वतीने ठरवण्यात  आले आहे.  सरकारने आरक्षण नाहीच दिले तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात साखळी उपोषण, तसेच कँडल मार्च, तसेच प्रत्येक दिवशी एक गाव या प्रमाणे साखळी उपोषण अशी तालुक्यातील दिशा ठरणार आहे, तरीही उपोषण भेटले नाही तर प्रत्येक गावात आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
इतर बातम्या
नाशिकमध्ये

Nashik :

Join Whatsapp Group