माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्र्यंबक राजाच्या चरणी लीन
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्र्यंबक राजाच्या चरणी लीन
img
दैनिक भ्रमर
त्र्यंबकेश्वर :- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरत्या वर्षाला निरोप  देताना त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेतले. माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या समवेत त्यांची पत्नी व मुलगी उपस्थित होते.  सकाळपासून येथे पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांचे आगमन झाले.मंदिर सभामंडपात पूजा अभिषेक करण्यात आला.

यावेळी पौरोहित्य विश्वस्त व पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी केले. पूजा अभिषेक संपन्न झाल्या नंतर मंदिर प्रांगणात आले तेव्हा त्यांनी देशाच्या व विश्वाच्या सुख समाधानासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले व सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांनी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शनाने कृतार्थ झालो असल्याची भावना व्यक्त केली.

दुपारी १.३० च्या दरम्यान नैवद्यासाठी गर्भगृह बंद होते. तेव्हा अर्धा ते पाउणतास दर्शन बंद होते. त्यानंतर माजी राष्ट्रपती यांच्या पूजा अभिषेक दरम्यान जवळपास अर्धा तास दर्शनार्थी भाविकांच्या रांगा थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस दर्शनाला आलेल्या भाविकांना दर्शनबारीत एकाच जागेवर तास दीड तास थांबावे लागल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

मंदिराचे विश्वस्त कैलास घुले, विश्वस्त रूपाली भुतडा यांनी कोविंद यांचे स्वागत केले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, प्रांताधिकारी पवार, तहसीलदार श्वेता संचेती, त्र्यंबक नगर परिषदेचे अमोल दोंदे, नितीन शिंदे आदी उपस्थित होते. पोलीस उप अधिक्षक वासुदेव देसले, निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group