श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 वाजता उघडणार
श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 वाजता उघडणार
img
Dipali Ghadwaje


नाशिक (प्रतिनिधी) :- अधिक मासापाठोपाठ श्रावण महिन्यातही त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार आहे, हे लक्षात घेऊन हे मंदिर भाविकांसाठी रोज पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे, तसेच दर सोमवारी पहाटे चार वाजता मंदिर दर्शनासाठी उघडले जाणार आहे. 

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार भाविकांना पूर्व दरवाजा येथे वातानुकूलित दर्शनरांग, तसेच या रांगेत ज्येष्ठांना बसण्यासाठी व्यवस्था, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य कक्ष आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. 

तसेच स्थानिक ग्रामस्थांना सकाळी मंदिर उघडल्यापासून ते सकाळी साडेदहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनाची वेळ देण्यात आली आहे; मात्र त्यासाठी ओळखपत्र आवश्यक राहील व उत्तर दरवाजातून जाळी गेटने प्रवेश दिला जाईल. धर्मदर्शन रांग पूर्व दरवाजा, देणगीदर्शन रांग उत्तर दरवाजा येथून राहील, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने एका पत्रकान्वये देण्यात आली आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group