बैलपोळ्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने रथाच्या बैलांचे पूजन
बैलपोळ्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने रथाच्या बैलांचे पूजन
img
Dipali Ghadwaje
त्र्यंबकेश्वर मंदिरात देवस्थान ट्रस्ट मार्फत आज बैल पोळा सणाच्या निमित्ताने श्री त्र्यंबकराजांना माध्यान्ह पूजेत पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला.

पोळ्याच्या दिवशी देवस्थानची परंपरेनुसार  मानाची रथाची बैल जोडी देवस्थान कोठी कार्यालय येथे आल्यानंतर औक्षण करण्यात आले. गाजरे बंधू यांच्या मानाच्या बैलांना विश्वस्तांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. तसेच यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

 याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त श्री पुरुषोत्तम कडलग, श्री स्वप्नील शेलार, श्री सत्यप्रिय शुक्ल, श्री मनोज थेटे हे उपस्थित होते. 
अशा प्रकारे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे बैलपोळा सण उत्साहात व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group