पतीच्या मारहाणीत नवविवाहित पत्नीचा मृत्यू; नाशिक जिल्ह्यातील घटना
पतीच्या मारहाणीत नवविवाहित पत्नीचा मृत्यू; नाशिक जिल्ह्यातील घटना
img
दैनिक भ्रमर
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात तळेगाव अंजनेरी येथे पतीच्या मारहाणीत नवविवाहित पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

संशयित रोहित पुंडलिक खाटिकडे व मयत महिला यांचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. ही विवाहिता 2 महिन्यांची गर्भवतीही होती.

रोहितने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यात ती बेशुद्ध झाली. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पतीसह सासू, नणंद व सासऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group