नाशिक :- मनपाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या अडचणी वाढणार आहेत. लाच घेताना त्यांना पकडल्यानंतर त्यांची चौकशी सुरू होती.
आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 96 लाख 43 हजार 809 रुपयांची बेहोशोबी मालमत्ता मिळून आली.
श्रीमती सुनिता सुभाष धनगर यांच्या मालमत्तेची उघड चौकशी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे सुरू होती.
या उघड चौकशीमध्ये त्यांनी दिनांक 15/06/2010 ते दिनांक 03/06/2023 रोजी दरम्यानच्या कालावधीत शासकीय सेवेत लोकसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या कायदेशीर ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक 96,43,809 रुपये इतकी अपसंपदा जमा केल्याचे दिसून आले. म्हणून त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनयम १९८८ चे कलम १३ (१) (ब) / १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.