सिडकोतील खुनाचा उलगडा;
सिडकोतील खुनाचा उलगडा; "या" कारणातून झाला होता खून
img
DB

नाशिक :- सिडकोतील शिवाजी चौकात आज दुपारी एका युवकाच्या खून प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह 5 जणांना ताब्यात घेतले आहे. हा खून जुन्या वादातून झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, अंबड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे पथकासह दाखल झाले होते. त्यांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी ओम प्रकाश पवार उर्फ मोठा ओम्या खटकी याच्यासह ओम चौधरी उर्फ छोटा खटकी, साईनाथ गणेश मोरताटे उर्फ मॅग्गी मोऱ्या, अनिल प्रजापती व पार्थ साठे या 5 आरोपींना अवघ्या 3 तासांत ताब्यात घेतले. इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. या खून प्रकरणात एकूण 8 आरोपी होते, तिघांचा शोध अजून सुरू आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group