संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पहिला पुर; गंगापूर धरणातून आता
संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पहिला पुर; गंगापूर धरणातून आता "इतक्या" पाण्याचा विसर्ग
img
Dipali Ghadwaje

नाशिक - नाशिक जिल्ह्यात काल सायंकाळपासून सुरू असलेल्या सतत च्या पावसामुळे गोदावरी नदीला यावर्षी पहिला पूर आला आहे.

गंगापूर धरणातून रात्री 8 वाजता 2208 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने संध्याकाळ पासून एकूण 6282 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात 62.4 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर हरणबारी, गिरणा आदी धरणातुनही पाणी सोडण्यात आले आहे.

गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार चालू आहे. पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्याटप्याने वाढवण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. गोदावरी नदीला या हंगामातील पहिला पूर आला आहे.

या पुरामुळे रामकुंड परिसरातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्यामुळे पूरस्थितीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

तसेच गिरणा नदी पात्रातील पाणी विसर्गात चनकापूर धरण -   33000 क्युसेस, पुनद धरण -  16000 क्युसेस, मोसम नदी पात्रातील पाणी विसर्ग, हरणबारी धरण - 5500 क्युसेस, आरम नदी पात्रातील पाणी विसर्गात केळझर धरणातून - 5000 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group