गुड न्यूज! महामंडळाने घेतला ऐतिहासिक निर्णय; ताफ्यात दाखल होणार नव्या दोन हजार बस
गुड न्यूज! महामंडळाने घेतला ऐतिहासिक निर्णय; ताफ्यात दाखल होणार नव्या दोन हजार बस
img
Dipali Ghadwaje
मुंबई : सर्वसामान्य जनतेला देखील दिलासा देणारी बातमी आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या  2200 गाड्या दाखल होणार आहे. एसटीकडून इतिहासात पहिल्यांदाच गाड्या बाहेरुन बनवून ताफ्यात सामील करणार  आहे.  खराब गाड्यांमुळे महामंडळाची जी प्रतिमा मलिन झाली होती ती सुधारण्यास मदत होणार आहे. 

एसटी महामंडळाकडून खासगी कारखान्यांमध्ये बांधणी करत तात्काळ गाड्या आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एसटी महामंडळाकडून वर्कशॉपऐवजी गाड्या बाहेरुनच बांधणी करुन येणार आहे. 

येत्या काही दिवसात यातील पहिला लॉट दाखल होणार आहे. या सर्व गाड्या एसटीच्या मालकीच्या असणार आहे. या नव्या गाड्यांसाठी आधीच बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, या गाड्या लवकर दाखल झाल्या असत्या मात्र एका बड्या कंपनीकडून निविदा चुकीचं भरल्याने मोठा अवधी गेला.  अशात ‘त्या’ बड्या कंपनीचं पाच कोटींचं डिपॉझिट महामंडळाकडून जप्त करण्यात आल्या आहेत. 

एसटी वर्कशॉपमध्ये नव्या गाड्या खरेदी केल्यानंतर त्याचे चेसिस बसवण्याचे काम केले जात असते.  साधारण दिवसाला चार गाड्यांची निर्मिती करण्याची एसटीची क्षमता आहे. मात्र, ही संख्या अपुरी असल्याने आणि गाड्यांची तात्काळ गरज असल्याने थेट बाहेरुनच चेसिस बांधणी करत गाड्या दाखल होणर आहे. राज्य सरकारकडून घोषणा केलेल्या पाच हजार इलेक्ट्रीक बसेस आणि एलएनजीवरील गाड्या येण्यास बराच अवधी जाणार असल्याने प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

तसेच एसटीच्या खराब गाड्यांचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर सातत्याने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असून त्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे.

एसटीच्या ताफ्यात साडे नऊ हजार जुन्या गाड्या
तीन बड्या कंपन्यांच्या गाड्या दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 10 वर्षांहून अधिक काळ झालेल्या गाड्यांची संख्या जवळपास साडे नऊ हजार इतकी आहे.  एसटीची मासिक तूट 24 कोटींवर आली आहे, जी आधी 200-250 कोटी रुपये होती . येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ नफ्यात येण्याचा अंदाज आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group